१३२ खेळाडूंनी नोंदविला सहभाग
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेतर्फे आयोजित बहुप्रतीक्षित माहेश्वरी बॅडमिंटन लीगच्या तिसऱ्या पर्वाची दोन दिवसीय क्रीडा महोत्सवातून उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. स्पर्धेत आठ संघांमधील १३२ खेळाडूंनी सहभाग घेत उत्कृष्ट क्रीडा कौशल्य, शिस्त आणि सांघिक भावनेचे दर्शन घडविले.
समारोपप्रसंगी महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते टॉस करून सामन्याचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. यावेळी माहेश्वरी युवा संघटनेतर्फे बोराळकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अखिल भारतीय
राजस्थानी महिला अध्यक्षा रेखा राठी, माहेश्वरी जिल्हा सभा अध्यक्ष अजित नावंदर आणि माहेश्वरी मंडळ अध्यक्ष सुनील मालाणी यांची विशेष उपस्थिती होती.
संघटनेचे अध्यक्ष वैभव मंडोरा, सचिव श्रीनिवास लखोटिया, कोषाध्यक्ष अमित मानधने आणि क्रीडा मंत्री गोपाल दाड यांनी स्पर्धे च्या आयोजनासाठी सहकार्य करणारे पदाधिकारी, प्रायोजक, खेळाडू, पंच आणि संपूर्ण सहकारी टीमचे आभार मानले. यावेळी प्रमुख प्रायोजक प्रहलाद स्पोर्ट्स (हितेश नारखेड़े), रेजिलिया फिजिओथेरपी अँड स्पोर्ट्स क्लिनिक (डॉ. दीपेश राठी), कामधेनू टेक्नोव्हिजन (राहुल जाजू) तसेच युवा साथी प्रणय जेथलिया यांच्या विशेष योगदानाचे कौतुक करण्यात
HAMPIONS
आले. स्पर्धेत एएम वॉरियर्स: अभिजीत मुंदड़ा, बागला स्मॅशर्स : सारंग बागला, सीएसएन चॅलेंजर्स: पुष्कराज दरगड़ व सीए शुभम राठी, मालपानी टायगर सुरेश आजमेरा व मयूर मालपानी, नेट निन्जाज: कुणाल मंत्री व सुमित खट्टोड़, श्रीकृष्णा स्मॅशर्स डॉ. रोहित बंग, सोमो स्मॅशर्स शुभम सोमानी व हर्षित मोदानी आणि कर्मा : नरेंद्र करवा व वैभव मालपाणी यांचेही आभार मानण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामागे प्रकल्प अध्यक्ष सीए रमन लोया, सीए पंकज सोनी, राजीव मिनियार, अमर मुंदाडा,
सीए तुषार सामधानी, तन्मय काबरा आणि परेश सारडा यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. तसेच श्रेयस नावंदर, मार्गदर्शक अरुण पचेसिया, अमिता सोनी, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि सहकारी कर्मचाऱ्याचे आभार मानले. तिसऱ्या उत्स्फूर्त पर्वाला मिळालेला प्रतिसाद पाहता आगामी माहेश्वरी बॅडमिंटन लीगचे चौथे पर्व अधिक भव्य, आकर्षक आणि नव्या स्वरूपात आयोजित करण्याचा संकल्प संघटनेचे अध्यक्ष वैभव मंडोरा आणि सचिव श्रीनिवास लखोटिया यांनी व्यक्त केला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














